Homeउद्योजकता पुष्प पहिले
उद्योजकता पुष्प पहिले
उद्योजकता पुष्प पहिले

उद्योजकता पुष्प पहिले

 
₹20
Product Description

प्रा. प्रकाश भोसले यांचे "उद्योजकता " हे ई-बुक रूपात....

सध्या देशभर लॉक डाउन स्थिती असल्यामुळे प्रा. प्रकाश भोसले लिखित 'उद्योजकता' हे पुस्तक पोस्ट किंवा कुरियरद्वारे पाठवले जाऊ शकत नाही.त्यामुळे आमच्या तमाम वाचक मित्रांसाठी आम्ही हे ई-बुक स्वरूपात व अत्यल्प दारात उपलब्ध करून देत आहोत. मित्रहो आजची परिस्थिती पाहता अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत आणि ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत ते असंतुष्ट आहेत. अश्यावेळी उद्योगात पाऊल ठेवणे हा एकमेव पर्याय आहे. संपूर्ण मराठी माणसांमध्ये व्यावसायिक मानसिकता रुजवण्याचे काम 'उद्योजकता' चळवळीमधून करीत आहे. या चळवळीतून तुम्हाला विविध उद्योगांबद्दल आणि उद्योगातील महत्त्वपूर्ण पैलूंबद्दल तुम्हाला अधिकाधिक ज्ञान कसे मिळेल, तुम्हाला प्रेरणा कशी मिळेल, तुमच्या व्यवसायात प्रगती कशी होईल याविषयी अश्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत . एखाद्यास काही फुकट किंवा आयते काही दिले तर त्याला त्याचे खरे मूल्य समजत नाही, म्हणूनच हे पुस्तक अत्यल्प मूल्यात केवळ रु. २०/- मध्ये उपलब्ध केले आहे. जेणेकरून सर्वसामान्य वाचकांच्या खिश्याला परवडेल. या पुस्तकाच्या विक्रीमूल्यातून येणारे उत्पन्न हे 'मराठी उद्योजकता' चळवळ' वाढवण्यासाठी उपयोगात आणत असतो. हे ई-बुक पासवर्ड प्रोटेक्टेड असेल.

या ई-बुकचे सर्व हक्क राखीव आहेत . या प्रकाशनाचा कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय छायाचित्रण, रेकॉर्डिंग किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक किंवा यांत्रिकी पद्धतींसह कोणत्याही स्वरुपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनर्निर्मित, वितरित किंवा प्रसारित केला जाऊ शकत नाही. हे ई-बुक आपल्या वैयक्तिक वाचनासाठीच परवानाकृत आहे. या ई-बुकची पुनर्विक्री केली जाऊ शकत नाही किंवा इतरांसोबत ते सामायिक केले जाऊ शकत नाही. त्यासाठी ई-बुकच्याअतिरिक्त प्रती विकत घेणे अनिवार्य आहे, कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करून या ई-बुकचा बेकायदेशीरपणे वापर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now